स्वर्गीय यश शितलकुमार मणेरे यांची दहावी पुण्यतिथी साजरी
इचलकरंजी:-हबीब शेखदर्जी
दि:-८ श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे ट्रस्टीज स्व.यश शितलकुमार मणेरे यांची दहावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक मा.श्री. अशोक वसगडे हे उपस्थित होते. संस्थेचे समन्वयक मा.श्री. अशोक वसगडे यांच्या हस्ते स्व.यश शितलकुमार मणेरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने संस्थेचे ट्रस्टीज स्व.यश शितलकुमार मणेरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. डी.डी. चौगुले यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापूरे, कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.