मोफत ऊसतोड मजूर आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
श्री दत्त साखर शिरोळ कार्यस्थळावर ८० हून अधिक ऊसतोड मजुरांची तपासणी
शिरोळ :-राम आवळे
दि:-१४ प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण, कोल्हापूर व जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या सूचनेनुसार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर, शिरोळ यांच्या शेती विभागातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. साखर शाळा, कार्यस्थळ येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात कारखाना परिसरात वास्तव्यास असलेल्या ऊसतोड मजूर, महिला व बालकांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र घालवाड व ग्रामीण रुग्णालय शिरोळ यांचे सहकार्य लाभले. तपासणीमध्ये गर्भवती महिलांची तपासणी, रक्त तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणीचा समावेश होता.
तपासणी कार्यात प्राथमिक आरोग्य केंद्र घालवाडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन ढोणे, ग्रामीण रुग्णालय शिरोळचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. व्ही. डी. चव्हाण, श्री दत्त आरोग्य केंद्र प्र. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील,

सीएचओ डॉ. विवेकानंद हंकारे, सीएचओ डॉ. सॅमसन सावनोर, सीएचओ सौ. वर्षा लोखंडे यांनी ८० हून अधिक मजूर, महिला व बालकांची तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार केले.शिबिरासाठी औषध निर्माण अधिकारी श्री आशिष कुरणे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सौ. दिपाली शेटे, रूपाली खोंद्रे, आरोग्य सहाय्यक जमीर नदाफ, यास्मिन खान, अश्विनी मधाळे, आरोग्य सेवक श्री राजेश भांडवले, आरोग्य सेविका व्ही. ए. चुडमुंगे, के. व्ही. भोसले, के. बी. करे, एस. एन. कलावंत, शांताराम लांडे, सुनील कांबळे तसेच कारखाना आरोग्य सेवक श्रीकांत निर्मळे, स्टाफ नर्स किशोर कांबळे, शिपाई अनिल कोळी, वाहन चालक नामदेव रेळेकर, अँब्युलन्स ड्रायव्हर श्री रमेश गाडवे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.शिबिर यशस्वी करण्यासाठी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना, अमर चौगुले, केनयार्ड सुपरवायझर रावसाहेब गस्ते, शिफ्ट इंचार्ज सुनील खांडेकर यांनी विशेष मेहनत घेतली.या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा कार्यस्थळावरच उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.