सार्वजनिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनवावे :

मुख्य मंत्री कर्यालयाचे प्रधान सचिन विकास खारगे यांचे आवाहन

इचलकरंजी: विजय मकोटे
  दि:१० नोव्हेंबर :भविष्यामध्ये समाजातील सर्व घटकाची जनगणना करून त्या प्रत्येक घटकास कसे सहकार्य करता येईल याचा नक्की विचार केला जाईल. ज्यांचेकडे सर्व माहिती उपलब्ध आहे तो समाज पुढे जातो, त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक निवृत्त झाले आहेत त्यांना स्वावलंबी बनविणेकरिता सार्वजनिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये आर्थिक चणचण जाणवू नये यासाठी व आरोग्य संपन्न राहणेसाठी ज्यांना जे काम जमेल ते करत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले.
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते व देवांग समाजाचे अध्यक्ष विश्‍वनाथ मुसळे यांच्या हस्ते प्रधान सचिव विकास खारगे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष उदय बुगड, सचिव मिलींद कांबळे, सदस्य शिरीष कांबळे यांचेसह समाज बांधव यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा केली. तसेच ओबीसी आरक्षण आणि एसबीसी चे राजकीय व नोकरीतील आरक्षण संदर्भात अनेक मागण्या केल्या तर विणकरांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र कोष्टी समाजाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपकमांची माहिती देणेत आली. खारगे यांनी या दोन्ही संघटनांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी शंकरराव बापू खारगे, श्री. भंडारे, उध्दव खारगे, राहूल सातपुते, यश कांबळे, जयेश बुगड आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.