AI च्या मदतीने ४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक; रत्नागिरी पोलिसांची मोठी कामगिरी

रत्नागिरी:नियाज खान 

दि. १७ एप्रिल २०२६ — रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित “RAIDS App” चा वापर करून तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे गुन्हे अन्वेषणात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अधोरेखित झाला आहे.पोलीस विभागाने १५ डिसेंबर २०२५ रोजी “RAIDS App” यशस्वीरित्या विकसित केले असून, त्याद्वारे रत्नागिरीसह राज्यातील विविध जिल्हा पोलीस दलांना गुन्हे तपासात तांत्रिक मदत मिळत आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
या अॅपच्या सहाय्याने फरार आरोपी तसेच हरवलेल्या व्यक्तींचे फोटो अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा तयार (Reconstruct) करण्यात येतात. आतापर्यंत अशा प्रकारे १०८ प्रकरणांमध्ये फोटो पुनर्निर्मिती करण्यात आली असून, संशयितांची ओळख पटविणे आणि तपास अधिक वेगाने पूर्ण करण्यास मदत झाली आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक १९६/२०२२ अंतर्गत कलम ३८१, ३७९, ३४ नुसार गुन्ह्यातील आरोपी बुधराम रामलाल (वय ४२, मूळ रा. राजस्थान) हा सुमारे चार वर्षांपासून फरार होता. तपासादरम्यान आरोपी गुजरातमधील मुंद्रा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार “RAIDS App” च्या मदतीने आरोपीचा फोटो पुनर्निर्मित करून शोधमोहीम राबविण्यात आली.
त्यानंतर आरोपी मुंबईत आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर १५ एप्रिल २०२६ रोजी पनवेल येथील कळंबोली परिसरातून त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.या यशस्वी कारवाईमुळे रत्नागिरी पोलिसांच्या तांत्रिक क्षमतेचा आणि तपासातील वेग व अचूकतेचा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.