Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.३०: साखर उद्योगातील देशातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित तांत्रिक संस्था असलेल्या ‘द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (STAI) नवी दिल्लीच्या कौन्सिल सदस्यपदी सन २०२६ ते २०२९ या त्रैवार्षीक कालावधीकरिता मनोहर गोपाळ जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री. जोशी हे हुपरीतील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.
या निवडीद्वारे मनोहर जोशी हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गोवा या पाच राज्यांचा समावेश असलेल्या ‘रिजन ३.३.५’ चे प्रतिनिधित्व करणार आहेत. साखर उद्योगातील तांत्रिक आधुनिकीकरण, धोरण निश्चिती आणि संशोधनामध्ये या रिजनचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.१९२५ मध्ये स्थापन झालेली ही साखर उद्योगातील व्यावसायिकांची संस्था आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची मान्यता लाभलेली ही संस्था साखर उत्पादन, अभियांत्रिकी, शेती आणि उप-उत्पादने या विषयांत जागतिक स्तरावर कार्यक्षमपणे कार्य करते.
मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने आधुनिकीकरण आणि बगॅस व ऊर्जा बचतीत केलेले प्रयोग पथदर्शक ठरले आहेत. यामुळे जवाहर साखर कारखान्याने तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्यांच्या याच तांत्रिक अनुभवाचा लाभ आता देशातील पाच राज्यांतील साखर कारखान्यांना होणार आहे.असोसिएशनची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पहिली कौन्सिल मीटिंग येत्या १९ ऑगस्ट २०२६ रोजी गोवा येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक बैठकीत श्री. जोशी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारतील आणि साखर उद्योगाकरिता आगामी तीन वर्षांचा विकासाचा अजेंडा निश्चित करतील.
‘ही निवड म्हणजे महाराष्ट्रातील साखर तंत्रज्ञांनी माझ्यावर टाकलेला मोठा विश्वास आहे. आगामी काळात साखर उद्योगाला अधिक कार्यक्षम बनवणे, बायो-रिफायनरी मॉडेलला गती देणे आणि तांत्रिक क्रांतीद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणे ही माझी प्राथमिकता राहील असे मत श्री. जाशी यांनी निवडीच्या निमित्ताने व्यक्त केले.या निवडीबद्दल जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, संचालक मंडळ आणि साखर उद्योगातील मान्यवरांकडून श्री. जोशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.