पूंछ (जम्मू) सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: प्रतिनिधी

 दि.२३: पूंछ या जम्मूच्या सीमावर्ती भागातील युवक युवतींच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भारतीय सैन्यदलाच्या सद्भावना मोहिमेंतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.  राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी केली व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

     पाचपैकी तीन युवती राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू असून एका विद्यार्थिनीला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे असल्याचे तिने सांगितले. यावेळी मौलवी फरीद मलिक, शबनम परवीन, नवाझ मेहमूद, उमर अब्दुल्ला खान, मुबशीर अहमद, शाहिस्ता मजीद, आदिल मजीद, शबीना परवीन व नसीम फातिमा हे उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.