भारतीय सैन्यात निवड झालेल्या कबनूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव

कबनूर :हबीब शेखदर्जी 
दि.२६: कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या कबनूर हायस्कूलच्या दोन माजी विद्यार्थ्यांची भारतीय सेना दलात निवड झाल्याने विद्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शुभम दुर्योधन शिंदे आणि राजेश संदीप देसाई यांनी भारतीय सैन्यात स्थान मिळविल्याने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले यांच्या शुभहस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे कौतुक करत, देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी त्यांची झालेली निवड ही संपूर्ण विद्यालयासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही प्रामाणिकपणे देशसेवा करून विद्यालयाचे व परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

            यावेळी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले, पर्यवेक्षक पी. बी. पताडे, जिमखाना प्रमुख सुनील राजमाने, क्रीडा विभाग प्रमुख उमेश बरगाले यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण विद्यालय परिवाराने दोन्ही माजी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.