विविध उपक्रमांनी सुनिल पाटील यांचा वाढदिवस साजरा

इचलकरंजी : अन्वर मुल्ला 
दि.२९ : इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, सन्मती सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि सन्मती परिवाराचे आधारवड सुनिल सातगाेंडा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सन्मती सहकारी बँकेत आयाेजित रक्तदान शिबिराला उत्स्ूर्त प्रतिसाद मिळाला. तुलसी ब्लड बँकेच्या सहकार्याने आयाेजित शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी सन्मती सहकारी बँकेचे चेअरमन सिद्धांत पाटील, व्हाईस चेअरमन ए. जे. पाटील, बीओएम चेअरमन डाॅ. आप्पासाहेब हाेसकल्ले, संचालक महावीर येळरुटे, संजय कुडचे, मनीष पाेरवाल, सीईओ समीर मैंदर्गी, सीजीएम अशाेक पाटील, डेप्युटी जीएम हेमलता पाटील आणि बाेर्ड सेक्रेटरी महेश कुंभार, केवायसी मॅनेजर साै. सुमित्रा कागवाडे यांच्यासह प्रमुख मान्यवर व बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांनीही शिबिरात सहभाग घेतला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.