इचलकरंजी: विजय मकोटे
दि १७ डिंसेबर तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंडेवाडी येथे झालेल्या आंतरराज्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेत इचलकरंजीतील मल्ल कु. आर्या नवनाळे हिने अजिंक्यपदासह चांदीची गदा पटकविली. महिला गटाच्या अंतिम लढतीत कु. आर्या नवनाळे हिने कर्नाटक चॅम्पियन कु. प्रियंका मंगळुर हिला चितपट केले. विशेष म्हणजे कु. आर्या हिने अवघ्या दोन महिन्यात दुसर्यांदा चांदीची गदा पटकविली आहे.
श्रीक्षेत्र गुंडेवाडी येथे मॅटवरील आंतरराज्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुरुवातीपासूनच कु. आर्या नवनाळे हिने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. त्यामध्ये तिची कर्नाटक चॅम्पियन कु. प्रियंका मंगळुर हिच्याशी लढत झाली. अटीतटीच्या लढतीत नवनाळे हिने मंगळुर हिला लाटणे डावावर चितपट करुन अजिंक्यपद मिळविले. तिला मानाची मठाधिश चन्नमल्लिकार्जुन स्वामी यांच्या हस्ते चांदीची गादी व चॅम्पियनशीप किताब बहाल करण्यात आला. याप्रसंगी बिकेपीएस बँकेचे अध्यक्ष शिवानंद गोलबाळे, संचालक काशीनाथ कवठेकर, कृष्णा साखर कारखाना संचालक गुळाप्पा जेट्टी, पंचायत उपाध्यक्ष गुरुशांत जेट्टी, सदस्य चंद्रकांत गोंधळी, आण्णासाहेब नंदीवाले आदी उपस्थित होते. पै. आर्या नवनाळे हिला वस्ताद पै. सचिन पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पै. आर्या नवनाळे हिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.