रत्नागिरी संगमेश्वर मधे व्याघ्रगणना सर्वे पुर्ण

आरवली:सचिन पाटवले
जंगलामध्ये वाघांची व बिबट्यांची संख्या नेमकी किती आहे, या संख्येमध्ये किती वाढ झाली आहे, याबाबतची माहिती मिळवण्याकरिता दर चार वर्षांनी होणारी व्याघ्रगणना यावर्षी १५ ते २१ जानेवारी यादरम्यान होत आहे एकूण पाच जिल्ह्यांमध्ये ही व्याघ्रगणना होत आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. यासाठी सिंधुदुर्ग वन विभागाने पथके तयार केली आहे. ही पथके दर दोन कि.मी.च्या जंगल परिसरामधील निरीक्षणे नोंदवणार आहेत.
वाघांसह मांसभक्षी, तृणभक्षी तसेच त्यांच्या अधिवासाचे संनियंत्रण करण्यासाठी ही भारतीय ग्रह प्रगणना आयोजित केली आहे. ही गणना संपूर्ण देशभरामध्ये होणार आहे.
त्याच पद्धतीने संगमेश्वर तालुक्यामधे रत्नागीरी व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरती रातांबी गावातील भैरवगड येथे असलेले फाॅरेस्ट च्या जंगलामधे सतत तीन दीवस जाऊन संगमेश्वरचे फाॅरेस्ट अधिकारी कडुकर यांनी सर्वे पुर्ण केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.