मणेरे संकुलात प्रजासत्ताक दिन साजरा
कबनूर : प्रतिनिधी
दि:२६ जानेवारी श्री.देवाप्पा आप्पा मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात संपन्न झाला .
या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजन व ध्वजारोहणाने झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक मा.श्री. सुधाकररावजी मणेरे उपस्थित होते.
मा. श्री. सुधाकररावजी मणेरे यांनी “राष्ट्रभक्ती व देशाभिमान शाळेमधून शिकवला जातो. त्यातून भावी नागरिक घडत असतात तसेच मुलांनी संस्कार जपावेत व माता आणि मातृभूमी यांचा सन्मान करा” असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनीही भाषणे केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पाटील व्ही.डी. यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्री.तोडकर एन.एम. यांनी केले. तर आभार सौ.निंबाळकर के.एस. यांनी केले. यावेळी प्राथमिक मुख्याध्यापिका कु.तसलिम मणेर, उपमुख्याध्यापिका सौ.ऐनापूरे पी.बी., कॉलेजच्या प्राचार्या सौ.उर्मिला माने, कॉलेज इनचार्ज श्री.मलिक मणेर, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकही उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.