मिशन सागर अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी केला सागरी किनारा स्वच्छ.

रत्नागिरी:मैहरुनिसा साखरकर 

दि .१ फेब्रुवारी बंदोबस्तासाठी हातात नेहमी लाठी घेऊन उभे असलेले पोलीस कर्मचारी ,अधिकारी आपण नेहमी पाहतो . परंतु  लाठी ऐवजी झाडू हाती घेतलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी  यांनी .पर्यावरण रक्षणासाठी भाटे किनारा स्वच्छ करून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

मिशन सागर अंतर्गत रविवारी दि ३० जानेवारी रोजी रत्नागिरी पोलिस यांनी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली .तसेच समुद्रावर फिरायला येणाऱ्या  नागरिकांनीही कचरा दिसला तर स्वतः उचलून कचराकुंडीत टाकावा असे आवाहन देखील पोलिसांन कडून  करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .मोहित कुमार गर्क, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, राखीव पोलीस निरीक्षक रमेश निकम, राखीव पोलीस उपनिरीक्षक सुभाष तारये, पोलीस कवायत निर्देशक अजित किर, गिरीष सार्दळ, पूजा पाटील उपस्थित होते.१०१ नवप्रविष्ट अंमलदार, दंगा काबू पथकाचे १८ अंमलदार, शीघ्र कृती दलाचे ०६ अंमलदार, यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

३० जानेवारी हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आपण साजरी करत असल्यामुळे आणि गांधीजींना स्वच्छता अतिशय प्रिय असल्यामुळे आपण ही आपला परिसर स्वच्छ ठेवून राष्ट्रपिता गांधीजी यांना आंदरातली वाहू या असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्क यांनी यावेळी आपल्या पोलिस कर्मचारी सहकार्याना सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.