इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकात मराठी भाषा गौरव दिन साजरा
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२७ फेेबुवारी :कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिन येथील मध्यवर्ती बसस्थानकात साजरा करण्यात करण्यात आला.
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त कर्मचारी व प्रवाशांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते कविवर्य वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना साखर व पेढे वाटण्यात आले.
यानिमित्त बसस्थानकात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. बसस्थानकाच्या ध्वनिक्षेपकावरून दिवसभर सातत्याने ‘मराठी भाषा गौरव दिना’ च्या हार्दिक शुभेच्छा हा संदेश प्रसारित करण्यात आला. तसेच बसस्थानकाच्या उदघोषणा यंत्राद्वारे कवी सुरेश भट यांनी लिहिलेले आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले “लाभले आम्हास भाग्य” हे मराठी अभिमान गीत प्रवाशांना दिवसभर ऐकविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) संतोष बोगरे, स्थानकप्रमुख श्रीमती सुवर्णा वड्डे, प्रा. चौगुले, वाहतूक नियंत्रक रमेश थोरवत, श्रीकृष्ण खामकर, किरण कालेकर, प्रमोद हेरवाडे, लिपिक दिपाली सवाईराम आदीसह प्रवाशी उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.