सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,: प्रतिनिधी

 दि. 28 : राज्यातील महत्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योगव्यवसायरोजगाराचे महत्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरणलोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न उद्धभवतो आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न तातडीने मार्गी लावाही योजना दोन वर्षात पूर्ण कराअसे निर्देश देत या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. निधीअभावी ही योजना रखडणार नाहीअसे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोलापूर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे)महसूल विभागाचे अपरमुख्य सचिव नितीन करीरमदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्तावित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्तानगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठकपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वालसोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिव शंकरसोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आदी मान्यवरांसह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेएकरूख तलाव पाणी पुरवठा योजनाभिमा नदी टाकळी पाणीपुरवठा योजनाउजनी जलाशय योजना या तिन्ही योजनांतून व्यवहार्य आणि खात्रीशीर स्त्रोत तपासल्यानंतर सोलापूर शहरास पिण्यासाठी उजनीतून पाणीपुरवठा करणे सोयीचे होणार असल्याचे निदर्शनास येत आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारी जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे आता निधीअभावी ही योजना रखडणार नाही. सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी सूक्ष्म नियोजन करासध्याची 110 एमएलडी क्षमतेची योजना सुधारित करून ती 170 एमएलडी करताना सन 2035 ला सोलापूर शहराला लागणारे पाणी विचारात घ्यावेसोलापूर सीटी डेव्हलेपमेंट कार्पोरेशनमहानगरपालिकापाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी समन्वयाने काम करून या योजनेच्या कामाला गती द्यावीही योजना येत्या दोन वर्षात पूर्ण करावीअशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.