276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक : सहा नामनिर्देशनपत्र दाखल

कोल्हापूर:प्रतिनिधी

दि. 23  : 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज यशवंत कृष्णा शेळके (नॅशलन सोशॅलिस्ट पार्टी (युनायटेड)), सत्यजित (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी), सीमा शशिकांत कदम (भारतीय जनता पार्टी), सुभाष वैजु देसाई (अपक्ष), जयश्री चंद्रकांत आण्णा जाधव  (इंडियन नॅशनल काँग्रेस), विजय शामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. आजपर्यंत एकूण नऊ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.