शरद कृषीचा विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पीड बॉल संघात निवड

जैनापुर,: प्रतिनिधी

दि..24 जैनापुर येथील शरद कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थिनी कु. रसिका पाटील हिची राष्ट्रीय स्पीड बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तसेच तीची अंडर-14 या टीमच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धा कपूरथाला (पंजाब) या ठिकाणी होणार आहे.

प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे, क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन नामदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.