जिजाऊंनी शिवरायांवर केलेले सुसंस्कार आपल्या मुलांवर करण्याची गरज
स्वाती गायकवाड सीआयडी विभाग जिल्हा उपअधिक्षक
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ४ मे :रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची केवळ जयंती साजरी न करता माझा मुलगा शिवाजी व्हावा असे संस्कार बालवयातच मुलांवर घडवले पाहिजेत. त्याकरता महिलांनी अगोदर जिजाऊ झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला अभिप्रेत असे स्वराज्य घडवले. आज महिलांवर वाढते अत्याचार कमी करायचे असतील तर जिजाऊंनी शिवरायांवर केलेले सुसंस्कार आपल्या मुलांवर करण्याची गरज आहे, असे आवाहन सीआयडी विभाग जिल्हा उपअधिक्षक स्वाती गायकवाड यांनी केले.

माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भोनेमाळ युवा मंचच्यावतीने पारंपारिक तिथीनुसार शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात व पालखी पुजन, प्रतिमा पुजन, महिला महोत्सव अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित महिला महोत्सव कार्यक्रमात पोलिस उपअधिक्षक गायकवाड बोलत होत्या.भोनेमाळ युवा मंचच्यावतीने विविध उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यंदाही शिवजयंतीचे औचित्य साधत दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची चार्टर्ड अकाउंटंट संजय अनिगोळ यांच्या हस्ते पूजा करून टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी मंडपात आणण्यात आली. हभप बाळासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा पार पडला. यावेळी नागरिक, वारकरी संप्रदाय या दिंडीत सहभागी झाले होते.
तद्नंतर माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवि जावळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.दुपारच्या सत्रात महिला महोत्सव अंतर्गत होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात पोलिस उपअधिक्षक स्वाती गायकवाड, अॅड. माधुरी काजवे, वैशाली नायकवडे यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून करण्यात आली. त्यामध्ये फणीगेम घेण्यात आले. त्यामधून विजेत्या प्रथम क्रमांकास चांदीचे पैंजण, द्वितीय क्रमांकास पैठणी व तृतीय क्रमांकास डिनर सेट बक्षिस देण्यात आले. सूत्रसंचालक मोनिका जाजू यांनी आपल्या खास शैलीने कार्यक्रमात रंगत आणली. या महिला महोत्सव व फणीगेममध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. जवळपास तीन तास हा कार्यक्रम रंगला होता.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी माजी नगरसेवक मनोज साळुंखे व उद्योगपती अनिल ठाणेकर पापा उस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली मंचचे अध्यक्ष संभाजी शिंगारे, उपाध्यक्ष अनिकेत सुतार, अभिजित माळी, दीपक कुरकुटे शेखर भंडारे व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.