श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समारंभ साजरा
इचलकरंजी :विजय मकोटे
दि. ६ मे.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून ना. बा. शिक्षण संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी केले.
या वेळी संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर मार्गदर्शन करताना म्हणाले,छ. शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्याच्या वाटचालीची परंपरा छ. शाहूमहाराजांनी जोपासली. छ. शाहू महाराज हे छ. शिवाजी महाराजांच्या नंतरचे भारतातील श्रेष्ट राजे होते. समाज सुधारक राजा म्हणून त्यांना सर्वत्र ओळखले जाते. समाजातील वंचितांना उपेक्षितांना सन्मान मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. उपेक्षित लोकांना शिक्षण देण्यासाठी वसतिगृहे काढली. वस्तीगृहांच्या खर्चाची व्यवस्था केली. मानगाव येथे बहिष्कृत समाज परीषद भरवून. डॉ. आंबेडकर यांच्याकडे नेतृत्व दिले. _डॉ आंबेडकर व छ. शाहू यांच्यामूळे भारतात समतेची चळवळ उभा राहीली._ सामाजिक सुधारणा करताना आपल्या राज्यातील जनतेच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतीच्या विकासासाठी बांधलेले राधानगरी धरण हे जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले पहिले धरण त्यांनी बांधले. पाश्चात्य देशांमधील सुधारणा भारतात राबवण्यासाठी प्रयत्न केले. भारतातील सामाजिक सुधारनेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते. या वेळी स्वागत प्रास्ताविक करताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर म्हणाल्या छ. शाहूमहाराज हे जनतेच्या मनावर राज्य करणारे राजे होते. छ. शाहूमहाराजांच्या सारखी लोककल्याणाची कामे दुसर्या कोणत्याही राजाने केली नाहीत.
आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून सर्वांना शिक्षणाची व्यवस्था केली. राजकीय निर्णय प्रक्रियेत बहुजन समाजाला स्थान देण्यासाठी प्रयत्न केले. हुजूर व मजूर ही इंग्लडमधिल सामाजिक व्यवस्था भारतात येवू नये यासाठी प्रयत्न केले. कुस्तीला प्रोत्साहन देवून जगात कोल्हापूरी कुस्तीला प्रसिद्धी मिळवून दिली. कृतीतून समाज परविर्तन करणारा रयतेसाठी स्वतःचे आयुष्य पनाला लावणारा राजा म्हणून छ. शाहूमहाराजांना ओळखले जाते.

या वेळी वार्षिक परीक्षा निकाल वाचन करण्यात आले. यशस्वी व गुणवंत विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व बक्षिसे वाटण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक म्हणून. ना.बा. शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री अहमद मुजावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी केले. यावेळी उपप्राचार्य आर. एस. पाटील उपमुख्याध्यापिका सौ एस. एस. भस्मे पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे क्रीडा शिक्षक प्रा शेखर शहा उपस्थित होते. स्वागत गीत सौ ए.ए रानडे यांनी गायले. सूत्रसंचलन सौ. व्ही डी रावळ यांनी केले. यावेळी शिक्षक पालक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.