लायन्स क्लब इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १२ मे :गेल्या ६३ वर्षापासून शहर व परिसरामध्ये सामाजिक व इतर अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर सचिवपदी सुभाष तोष्णीवाल खजिनदारपदी संदीप सुतार यांची निवड करण्यात आली. क्लब अॅडमिनीस्ट्रेटर म्हणून पी. एम.जे. एफ. विजयकुमार राठी हे काम पाहणार आहेत. ही निवड सन २०२२-२३ या वर्षाकरिता आहे. लक्ष्मीकांत भट्टड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्लबच्या मिटिंगमध्ये नॉमिनेशन कमिटी चेअरमन गजानन होगाडे यांनी सदर सदस्यांची नावे जाहीर केली. त्यास सर्व सदस्य सभासदांनी मान्यता दिली. सदर मिटिंगला लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड, झोन चेअरमन महेश सारडा, पी. एम.जे. एफ. विजयकुमार राठी, एम.जे. एफ. डॉ. विलासभाई शहा, विजयराज जाजू, भरत भंडारी, लिंगराज कित्तुरे, सुरेश पाटील, कृष्णा भराडिया, मनोज सोमाणी, सौ. कनकश्री भट्टड, सौ.स्वाती राठी, सौ.महादेवी कित्तुरे व अन्य लायन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.