घरफोडी चोरीतील २ आरोपी जेरबंद करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश
जयसिंगपूर :विजय धंगेकर
दि.२०मे.जयसिंगपुर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाकडून घरफोडी चोरीतील २ आरोपी जेरबंद करून त्यांचेकडुन ३०,०००/- रू. किंमतीचा लॅपटॉप जप्त करणेत जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे
जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं. १६०/२०२२ भा.द.वि.स. कलम ३८० प्रमाणे १७ मे 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने मा. पोलीस निरिक्षक राजेंद्र मस्के यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत शोध पथकास आदेश पारित केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने तपास करताना पो. कॉ. १३३३ रोहीत डावाळे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळालने संशयीत आरोपी १] प्रविण २] समीर हुसेन शेख २४ दोघे राहणार रामनगर जयसिंगपूर ता. शिरोळ यांना ताब्यात घेऊन त्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी वरील दाखल असलेला गुन्हा केलेचे कबुल करून आरोपीचे कडून गुन्हा चोरीस गेलेला ३०,०००/- रुपये किमतीचा लॅपटॉप जप्त केला आहे.
सदर कारवाई मा. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक गडहिंग्लज विभागश्रीमती जयश्री गायकवाड उपविभागिय पोलीस अधिकारी मा. श्री. रामेश्वर वैजणे यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरिक्षक राजेंद्र मस्के पोलीस इन्स्पेक्टर श्री वाघ, पो कॉ. १२५३ बन्ने म.पो. हे कॉ. २९० कांबळे, पो.ना. १०५३ अभिजीत भातमारे, पोलीस कॉन्स्टेबल ८८५ संदेश शेटे, पो. कॉ. १३३३ रोहीत डावाळे, पो. कॉ. २५४५ वैभव सुर्यवंशी, आदींनी केली
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.