कर्नाटक काँग्रेस चे प्रवक्ते,आ. नागराज यादव यांची मुस्लिम बोर्डिंगला भेट
मुस्लीम समाजातर्फे छ. शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तक दिले भेट
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. ९जून :कर्नाटक काँग्रेस चे प्रवक्ते,आमदार नागराज यादव यांनी कोल्हापूर येथे श्री अंबाबाई देवी (महालक्ष्मी) चे दर्शन घेतले.या वेळी आशकिन आजरेकर ,बेळगाव काँग्रेस चे दीपक पाटील, ॲड. तोफिक मोमीन,शेखर शेट्टी, समीर दलवाई उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या संबंधित माहिती घेत मुस्लिम बोर्डिंगला भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.या वेळी मुस्लिम बोर्डिंग चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादरभाई मलबारी, बैतूलमाल कमिटीचे अध्यक्ष जाफरबाबा सय्यद, माजी नगरसेवक राहुल चव्हाण,शेखर उपस्थित होते.या वेळी आमदार नागराज यादव साहेबाना राजश्री शाहू महाराज यांच्या वर आधारित पुस्तक भेट देण्यात आली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.