स्वर्गीय.सौ.सरोज सुधाकर मणेरे यांची ६वी पुण्यतिथी

कबनूर : हबीब शेखदर्जी

दि. ५ जुलै :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विदयामंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या स्वर्गीय सौ.सरोज सुधाकर मणेरे यांची सहावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे तसेच उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे हे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे यांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा कै.सौ.सरोज सुधाकर मणेरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा कै.सौ.सरोज सुधाकर मणेरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ.राजश्री रामाणे, प्रास्ताविक सौ.अर्चना ऐनापुरे व आभार सौ.अनिता कोळी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. तसलिम मणेर, उपमुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापुरे, कॉलेज प्राचार्या सौ.उर्मिला माने तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.