देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त कोळंबे हायस्कूल यांची हर घर तिरंगा यात्रा प्रभात फेरी

कडवई:

हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादीचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे हा या मोहिमेमागील संकल्पना आहे.कोळंबे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विध्यार्थ्यां कडून आज प्रभात फेरी काढण्यात आली.
नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाची जाणीव वाढवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.या प्रभात फेरी मध्ये संस्थेचे अध्यक्ष नयनभाऊ मुळ्ये,मुख्याध्यापक संजय मुळ्ये,पर्यवेक्षक रवी मुळ्ये,भिवलकर मॅडम,खांबे सर,कोळपे सर,सरपंच,ग्रामस्थ,शाळेचे शिक्षक,कर्मचारी,विध्यार्थी सहभागी झाले होते. प्रचंड पाऊस असताना देखील प्रभात फेरी मधील विध्यार्थ्यांची शिस्त तसेच वेग वेगळे कलाविष्कार याने प्रेक्षकांची मने अशा प्रकारे ही दुमदुमत जाणारी प्रभात फेरी अखेर हर घर तिरंगा, हर मन तिरंगा अशी आनंदात व उत्स्फूर्त संपन्न झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.