जिल्ह्यातील २ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच ध्वज स्तंभ खोतवाडीत
75 फुट उंचीच्या ध्वज स्तंभावर आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
तारदाळ : प्रतिनिधी
दि. १४ ऑगस्ट :खोतवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिरात उभारण्यात आलेल्या 75 फुट उंचीच्या ध्वज स्तंभावर शनिवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कोल्हापूर शहरानंतर जिल्ह्यातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात उंच ध्वज स्तंभ खोतवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आला आहे. 6 बाय 9 फुट लांबीचा ध्वज आज सकाळी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते फडकविण्यात आला. गोविंदराव हायस्कूलमधील एनसीसीच्या कॅडेटस् व डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी ध्वजास मानवंदना दिली.

याच परिसरात उभारण्यात आलेल्या भारतमातेच्या मूर्तीचे पुजन जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिराचे अध्यक्ष दिलीप शेंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे, प्रकाश दत्तवाडे, सौ. द्राक्षायणी पाटील, बाळासाहेब कलागते, सौ. दीपश्री शेंडे, प्रकाश रावळ, पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार, सौ. संगिता आलासे, राजू आलासे, सौ. व्ही. एच. उपाध्ये, एनसीसी ऑफिसर सी. पी. कोरे, डॉ. प्रसाद मिरजे, सुहास पवळे, सरपंच संजय चोपडे, चंदू खोत, वैभव पोवार, गजानन नलगे, बापू चोपडे, बजरंग चोपडे, राहुल बुरसे, सारिका माने, अश्विनी बुरसे, नाना कांबळे, सौरभ खोत, विनायक बचाटे आदींसह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.