जनसामान्यांची बँक म्हणून सन्मती बँकेची ओळख

सन्मती सहकारी बँकेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २७ ऑगस्ट :जनसामान्यांच्या विश्‍वासास पात्र ठरलेल्या सन्मती सहकारी बँकेने बदलत्या काळानुरुप अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. 28 व्या वार्षिक सभेच्या निमित्ताने बँकेमार्फत सुरु केलेल्या मोबाईल बँकिंग व क्युआर कोड सुविधेचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. बँकेचे चेअरमन सुनिल पाटील यांनी, मुख्य शाखेसह 12 शाखा असून त्या माध्यमातून अहवाल सालात 521 कोटीचा व्यवसाय पूर्ण केला असल्याचे सांगितले.
सन्मती सहकारी बँकेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे संपन्न झाली. प्रारंभी संचालक चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर अध्यक्षस्थानावरुन बोलताना चेअरमन सुनिल पाटील यांनी प्रास्ताविकात बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जनसामान्यांची बँक म्हणून सन्मती बँकेची ओळख निर्माण झाली आहे. बँकेने रौप्य महोत्सव पूर्ण करुन सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. मल्टिस्टेटमुळे अनेक कायद्यांचे बंधने आल्याने सर्वसामान्य सभासद केंद्रबिंदू मानून व कायदा-ग्राहक यांची सांगड घालून काम करणे गरजेचे बनले आहे. बँकेने मल्टिस्टेट दर्जा प्राप्त करुन ग्रामीण भागात शाखा काढून वंचित घटकांना बँकिंग प्रवाहात आणायचा प्रयत्न केला आहे. आधुनिक काळानुसार बँकेने आवश्यक त्या सेवा देण्याचा प्रयत्न सुरु केला असून मोबाईल बँकिंगबरोबर लवकरच नेटबँकिंगची सुविधाही पुरवली जाणार असल्याचे सांगितले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी उपस्थित सभासदांनी सर्वच विषयांना एकमताने मंजूरी दिली. शेवटी आभार व्हा. चेअरमन एम. के. कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार व शशिकांत मुद्दापुरे यांनी केले. याप्रसंगी स्वप्निल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश सातपुते, गुंडाण्णा रोजे तसेच संचालक अजित कोईक, शितल पाटील, डॉ. पुरुषोत्तम कुलकर्णी, शिवाजी माळी, आण्णासो मुरचिट्टे, प्रदीप मणेर, डॉ. आप्पासाहेब होसकल्ले, संचय चौगुले, हणमंत देशपांडे, श्रीमती जयश्री चौगुले, सौ. वसुंधरा कुडचे, मनिष पोरवाल, महावीर यळरुटे, समीर मैंदर्गी आदींसह सभासद उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.