रोजगार स्वयंरोजगार रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी मुजीबभाई खान
संगमेश्वर:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार कमिटीचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून मुजीबभाई खान यांची रत्नागिरी जिल्हा काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.मुजीब खान यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला हे पद दिल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते अनवर कादरी,सामाजिक न्याय विभाग काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव,रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव हनीफ खलफे,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष रत्नागिरी हारीश शेकासन,अल्पसंख्याक संगमेश्वर तालुका अध्यक्ष आसिफ काझी, संगमेश्वर तालुका अध्यक्ष दत्ता परकर तसेच संगमेश्वर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुजीबभाई खान यांचे अभिनंदन केले.

भारतीय काॅग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा.खासदार सोनियाजी गांधी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नाना भाऊ पटोले,रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील यांनी माझ्यावर काॅग्रेस पक्षाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. ती मी काँग्रेस पक्षाचा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून पक्षाचे प्रमाणिकपणे काम करून पक्ष संघटना बळकट कशी होईल तसेच पक्षाचे विचार व ध्येय धोरण तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहचतील यासाठी सतत प्रयत्नशील राहीन असे विचार नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग काँग्रेस मुजीब खान यांनी व्यक्त केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.