विधवा महिलांना ठेवीवरती सवलतीचा व्याजदर देणेच्या नविन्यपुर्ण उपक्रमास एकमताने मंजूरी

आदिनाथ को-ऑप बँकेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

इचलकरंजी : विजय मकोटे

दि. ३० ऑगस्ट :येथील श्री आदिनाथ को-ऑप  बँकेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ ऑगष्ट २०२२ रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाटयगृह येथे खेळीमेळीत पार पडली.

बँकेचे संचालक श्री. राजू मगदूम यांनी विधवा प्रथा बंदी उपक्रमास अनुसरून कोल्हापूर जिल्हातील हेरवाड व माणगांव या गावांनी पुढाकार घेऊन सदर प्रथा बंद केली असून त्यानुसार बँकेने विधवा महिला ग्राहकांना ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे ठेवीवरती सवलतीचा व्याज दर देणेची सभासदांकडून आलेली सुचना मांडली. या सुचनेनुसार सभेने विधवा महिला ग्राहकांना सवलतीचा व्याजदर देणेबाबत मान्यता दिली. तसेच बँकेकडील कोणत्याही सेवा त्यांना आपुलकीने व प्राधान्याने देणे बाबत ठराव एकमताने मंजूर केला.

बहुधा महाराष्ट्रातील पहिल्याच सहकारी बँकेने विधवा महिला ग्राहकांना ठेवीवरती सवलतीचा व्याजदर देणेची पध्दत सुरू केली असलेची सभासदांमध्ये चर्चा होऊन समाधान व्यक्त करणेत आले.

अध्यक्षीय भाषणात चेअरमन मा. सुभाष आदिशा काडाप्पा यांनी ८% डिव्हडंड जाहिर केला तसेच देशातील व महाराष्ट्रातील सहकारी बँकांची तुलनात्मक आकडेवारी मांडून महाराष्ट्रातील सहकारी बँकांचा ठेवीचा हिस्सा ६१.७३% इतका असलेने सांगितले त्यामुळे सहकारातील होणा-या बदलांचा जास्तीत परिणाम महाराष्ट्रावर होत असलेचे सुचित केले.

बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षी कल्लाप्पाना आवाडे (दादा) सभेस उपस्थित होते. तसेच मार्गदर्शकीय भाषणात मा. श्री. प्रकाशरावजी आवाडे (आण्णा) यांनी स्व. आप्पासो मगदूम यांनी सुरुवातीस शेअर गोळा करत असताना सायकल वरून फिरलेची आठवण केली. तसेच बँक कासव गतीने पण शिस्तबध्द पध्दतीने गुणवत्ता पूर्ण कामकाज करीत असलेचे त्याच प्रमाणे बँकेचे पहारेदार चांगले असलेने ठेवी सुरक्षित असल्याचे गौरवोदगार काढले. बँक आणखी मोठी करा असे आवाहन करून बँकेच्या पुढील प्रगतीस शुभेच्छा दिल्या.

सुरुवातीस तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर चे प्रा. एस. टी. जाधवसो यांचे सभासद प्रशिक्षण सत्र झाले. सभेची सुरूवात मंचावरील उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन व प्रथम तिर्थंकर आदिनाथ भगवान फोटो पुजनाने व स्व. आप्पासो मगदूम यांच्या फोटो जांनी झाली

स्वागत व श्रध्दांजली बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. बाळासाहेब पारीसा चौगुले यांनी केले. तदनंतर नोटीस वाचन उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. जयकुमार उपाध्ये यांनी केले. सभेमध्ये विषयवार मंजूरी बँकेचे संचालक श्री. रविंद्रकुमार देवमोरे यांनी केले. त्यास टाळयाच्या गजरात सभासदांनी मंजूरी दिली… सभासंदाच्या सुचना व शंका यांना समाधानकारक व समर्पक उत्तरे

मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. जे. बी. चौगुले यांनी दिली. यावेळी सरपंच श्री. राजू मगदूम यांना माणगांवमध्ये विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविलेबद्दल त्यांचा सत्कार ज्येष्ठ सभासद श्री गुंडाप्पा रोजे यांनी केले. तसेच श्री रविद्रकुमार देवमोरे यांची भारत वर्षीय दिगंबर जैन तिर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र प्रवेश वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवड झालेने त्यांचा सत्कार चेअरमन श्री. काडाप्पा यांनी केले. तसेच श्री.सी.डी. लडगे यांची दक्षिण भारत जैन सभा समन्वय समिती सेक्रेटरी पदी निवड झाल्याने व्हा चेअरमन श्री. बाळासो केटकाळे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.

त्याचप्रमाणे बँकेकडील उत्कृष्ठ कर्मचारी म्हणुन श्री. चंद्रकांत कांबळे, सौ. मानसी ठाकूदेसाई व श्री परशराम लगोटे यांचा सत्कार करणेत आला. उपस्थित सभासदांमध्ये श्री. अनिल बम्मण्णावर, सतीश मगदूम, संजय कांचनकोटी यांच्याकडून सुचना मांडणेत आल्या.. शेवटी आभार प्रदर्शन बँकेचे व्हा. चेअरमन श्री. बाळासो कल्लाप्पा केटकाळे यांनी केले

सदर सभेस संचालक श्री कुंतिलालजी पाटणी, डॉ. पारिसा बडवडे, श्री. बापूसो जमदाडे, श्री. चंद्रकांत मगदूम, श्री. गुरुनाथ हेरवाडे, श्री. शंकर हजारे, श्री. सुचित हेरवाडे, श्री. जिनेंद्र खोत, श्री. संपत कांबळे तसेच संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. पद्मावती लडगे, बीओएम सदस्य श्री मधुकर मणेरे, श्री सुदर्शन खोत, श्री. उमेश कोळी तसेच माजी चेअरमन श्री. बाळासो सिध्वाप्पा चौगुले, सभासद शामराव नकाते, आप्पासो देवमोरे, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, यशवंत दाडमोडे, महावीर मगदूम, बाबू सग्गे, प्रधान माळी, मोहन चौगुले, श्रेणीक मगदूम, सुकुमार पोते, डॉ. जयकांता बहवडे, श्रीम. कमल चौगुले, मॅनेजर श्री निलेश बामणे उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन श्री तिर्थंकर माणगांवे यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.