शासनाने सूत गिरण्यांना मदतीचा हात देण्याची सकारात्मक भूमिका घ्यावी तरच भविष्यात सूत गिरण्यांना किमान चांगले दिवस येतील

चेअरमन सौ. किशोरी आवाडे

इचलकरंजी : संजय आंबे 

दि. १७ :कापूस दरातील प्रचंड वाढ अन त्या अनुषंगाने सूताला नसलेली मागणी शिवाय वाढते वीज दर यामुळे सूत गिरण्या अनंत अडचणीतून मार्गक्रमण करीत आहेत. शासनाने सूत गिरण्यांना मदतीचा हात देण्याची सकारात्मक भूमिकाघेणे गरजेचे आहे. तरच भविष्यात सूत गिरण्यांना किमान चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा इंदिरा गांधी महिला सहकारी सूतगिरणीच्या चेअरमन सौ. किशोरी आवाडे यांनी व्यक्त केली.इंदिरा गांधी महिला सहकारी सूतगिरणीची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यस्थळी पार पडली. त्याप्रसंगी अध्यकस्थानावरून सौ. किशोरी आवाडे बोलत होत्या.

यावेळी सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व क. आ. इचलकरंजी जनता बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार प्रकाश आवाडे यांनी, सूत दरातील सततच्या दरवाढीने संपूर्ण वस्रोद्योग अडचणीत आला आहे. प्रसंगी तोटा सहन करुन सूत गिरण्या चालवल्या जात आहेत. या सर्व अडचणीवर मात करत पुढे जाऊया. सध्याचे राज्य सरकार वस्रोद्योगातील अडचणी सोडविण्यास सकारात्मक असून निश्‍चितपणे मार्ग निघेल असे सांगत आधुनिकीकरण गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रारंभी संस्थेच्या बोर्ड सेक्रेटरी सुनिता भरते यांनी नोटीस वाचन केले. विषयपत्रिकेचे वाचन प्र. कार्यकारी संचालक दीपक पाटील यांनी केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. आभार संस्थेच्या व्हा. चेअरमन सौ. संगिता नरदे यांनी मानले. सूत्रसंचालन वासुदेव गोरे यांनी केले.
यावेळी संस्थेच्या माजी चेअरमन सौ. सपना आवाडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, चंद्रकांत इंगवले, राजू मगदूम, महादेव कांबळे, सर्जेराव पाटील, महावीर कुरुंदवाडे, श्रेणिक मगदूम, सतीश कोष्टी, लक्ष्मी अनिल कुडचे, सुमेरू पाटील, सौ. अंजली बावणे, कांता बडवे, जया कागवाडे, अनुराधा भिडे, जुगनु पिरजादा, सुमन मोरे, जेवरबानू दुंडगे, नजमा शेख सर्व संचालिका आदिसह विविध संस्थेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.