दिलखुलास’ कार्यक्रमात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची मुलाखत
मुंबई : प्रतिनिधी
दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार, दि. 26 सप्टेंबर, मंगळवार दि.27 सप्टेंबर, बुधवार दि.28 सप्टेंबर आणि गुरुवार दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. माहिती अधिकारी श्रीमती वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने राबविलेले विविध उपक्रम, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात आयोजित कार्यक्रम, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, पर्यटन, आपत्ती व्यवस्थापन, पूर परिस्थितीत उपाययोजना अशा विविध विषयांची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.