जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कबनूर गावास 29 कोटीची सुधारित नळ पाणीपुरवठा मंजूर

कबनुर:प्रतिनिधि: हबीब शेख दर्जी

दि:२२:जुन:शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत कबनूर गावास सुमारे २९ कोटीची सुधारीत नळ पाणी पुरवठा मंजूर झाली आहे.

शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत कबनूर गावास सुमारे २९ कोटीची सुधारीत नळ पाणी पुरवठा मंजूर झाली आहे. सद्या या योजनेचे काम सुरु झाले आहे. दरम्यान या योजनेमध्ये नळकनेक्शन जोडून देणे, सोलर प्रकल्प उभारणे, पाईपलाईन साठी खोदाई केलेले रस्ते पुर्ववत करणे, आवश्यक तिथे वाढीव पाईप लाईन टाकणे आदिंचा समावेश करण्यासाठी ग्रामपंचायत व समितीने पुरवणी प्रस्ताव केला आहे. या प्रस्तावास तात्काळ मंजूरी मिळावी यासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे ग्रामपंचायत व जलजीवन समितीच्यावतीने सातत्याने पाठ- पुरवठा करण्यात आला व हा प्रश्न मार्गी लागला आहे.

नुकतेच माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे बरोबर दुरध्वनीवरुन झालेल्या संभाषणानुसार खासदार खासदार धैर्यशील माने यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेतली. कबनूरच्या जलजीवन योजनेच्या पुरवणी प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा केली. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रस्तावावर तात्काळ कारवाई करावी असे आदेश प्रधान सचिवाना दिले आहेत. त्यामुळे वाढीव प्रस्ताव मंजूरीचा प्रश्न मार्गी लागला आहे. यावेळी माजी ता. प. सदस्य प्रमोद पाटील, माजी उपसरपंच सुधीर पाटील व ग्रा. पं.सदस्य प्रविण जाधव यांची उपस्थिती होती. जीवन प्राधिकरणानेही प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे कबनूरकरांच्या मागणी प्रमाणे आतां कामे पुर्ण होण्यात अडचणी येणार नाहीत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.