माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
इचलकरंजी:प्रतिनीधी:कैयूम शेख
दि:०३:जुलै:सहकार महर्षि, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या 5 जुलै रोजी साजर्या होत असलेल्या वाढदिवसानिमित्त ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 ते 6 जुलै या कालावधीत आरोग्य तपासणी, पाककला व रांगोळी स्पर्धा, अॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग शिबीर तसेच हेअर स्टाईल व मेकअप सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. उर्मिला गायकवाड यांनी दिली
.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी रविवार 2 जुलै रोजी राजर्षि छत्रपती शाहू हायस्कूल येथे दुपारी 3 वाजता संस्कार भारती विषयक रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी रांगोळीचे साहित्य स्वत: आणावयाचे असून इच्छुकांनी 7057766596, 9767496940 व 9765025554 या क्रमांकावर संपर्क साधावा. सोमवार 3 जुलै ते बुधवार 5 जुलै असे तीन दिवस अॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग शिबीर घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबीर श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह (वरचा मजला) येथे होणार आहे. 5 जुलै रोजी आसरानगर परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात तज्ञ डॉक्टर्सकडून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व औषधोपचार केले जाणार आहेत. 5 जुलै रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत वंदेमातरम् सांस्कृतिक भवन बीजेपी मार्केटशेजारी येथे मोफत हेअर स्टाईल व मेकअप सेमिनार होणार आहे. नांव नोंदणीसाठी 9689233456, 7744970909, 9657473515 व 9145735351 यांच्याशी संपर्क साधावा. सर्वच स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. उर्मिला गायकवाड यांनी केले आहे. तर 6 जुलै रोजी श्रीराम हॉल करोडपती कॉलनी येथे हाडांची तपासणी शिबीर व हाडांच्या दुखण्यावर मोफत मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे.
दरम्यान, ताराराणी पक्ष महानगरपालिका कार्यक्षेत्र महिला आघाडीच्या वतीने व्हिजनस्प्रिंग दिल्ली व अनंतशांती सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थांच्या माध्यमातुन व वेध फौंडेशनच्या विशेष सहकार्याने सोलगे मळा येथे मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरामध्ये 140 महिलांना चष्म्याचे नंबर काढून अत्यल्प शुल्कात चष्मे वितरित करण्यात आले. यावेळी ताराराणी पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, कार्याध्यक्षा नजमा शेख, उपाध्यक्षा राजश्री अडगाणे, जयश्री शेलार, सेक्रेटरी रजनी शिंदे, खजिनदार अर्चना कुडबे, सेक्रेटरी सपना भिसे, सदस्य सीमा कमते, माजी नगरसेविका सुलोचना हेरवाडे, रुपाली कोकणे, संगिता नेमिष्टे,राजश्री माने,संगिता कोकीटकर, सुनिता पवार, संगिता हुग्गे, प्रधान माळी आदींसह वेध फौंडेशन पदाधिकारी तसेच व्हिजनस्प्रिंगचे राम पोले, संदीप थोरात श्रीकांत कुबेर व शिल्पा आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.