शिवसेना शाखा २०८ व ग्राहक संरक्षण कक्ष भायखळा आयोजित चुंबकीय निसर्गोपचार ॲक्युप्रेशर सुजोक शिबिरास आ. राजनजी साळवी यांची सदिच्छा भेट
मुंबई:प्रतिनिधि: (प्रमोद तरळ)
दि:३१:जुलै: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना उपनेते / एकनिष्ठ आमदार राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा डॉ. राजन प्रभाकर साळवी साहेब यांनी शाखा क्र. २०८ व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष भायखळा विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “चुंबकीय निसर्गोपचार ॲक्युप्रेशर सुजोक शिबिरास” सदिच्छा भेट दिली व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुधीर मोरे- शिवसहकार सेना -रत्नागिरी जिल्हा संपर्क संघटक, नामदेव नार्वेकर सहसंपर्कप्रमुख-शिवसेना राजापूर तालुका, सौ.अंजना औटी म.शाखासंघटक, सौ.शिल्पा जाधव सहसंघटीका भायखळा विधानसभा, शिल्पा म्हात्रे म. शाखा समन्वयक, कु.श्लेषा मालवणकर युवती शाखा अधिकारी , उपशाखाप्रमुख अशोक औटी, ऐतेश्याम खान, श्रीराम गावडे तसेच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष भायखळा विधानसभाचे एम.डी. कांबळे कक्ष विधानसभा संघटक, रमेश माडये कक्ष कार्यालय चिटणीस, नितिन गंधाले कक्ष विधानसभा प्रसारक, रविंद्र बाचणकर कक्ष उपसंघटक (२०७/२०८), संदेश कोटेकर कक्ष वार्ड संघटक(२१०), श्रीम. सुमित्रा वनवे सर्व पदाधिकारी, शाखा क्र२०८ चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
हे चुंबकीय शिबिर यशस्वी करण्यासाठी मा.नगरसेवक रमाकांत रहाटे, शाखाप्रमुख रमेश रावल यांचे विशेष सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.