मिरजेत व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच मुलाचा क्रूरपणे खून करून कटरने त्याच्या शरीराचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना …

... संतापलेल्या बापाकडून मुलाचा क्रूरपणे खून, कटरने केले शरीराचे तुकडे

मिरज:प्रतिनिधि

दि:०४:ऑगस्ट: मिरजेत व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच मुलाचा क्रूरपणे खून करून कटरने त्याच्या शरीराचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली. रोहित राजेंद्र हंडीफोड (वय २९, रा. गणेश तलाव पाठीमागे, मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज, शुक्रवारी सकाळी सुभाषनगर हंडीफोड मळा येथे ही घटना घडली.मुलाचा खून केल्यानंतर वडिल राजेंद्र यल्लप्पा हंडीफोड यांनी स्वतः पोलिसात हजर होऊन खुनाची माहिती दिली.

बापाने मुलाची क्रूरपणे हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी वडील राजेंद्र यल्लाप्पा हंडीफोड (वय ५०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गणेश तलाव मागे लक्ष्मी मंदिराजवळ राजेंद्र हंडीफोड यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. रोहित हा सुद्धा वडिलांचा दूधाचा व्यवसाय करीत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो व्यसनी कर्जबाजारी बनल्याने घरात नेहमी भांडण करीत होता. दारुचे व्यसन व गुन्हेगार मित्रांच्या संगतीमुळे रोहित बिघडला होता. रोहित याच्यावर मारामारी व इतर गुन्हे दाखल आहेत. रोहित हा दररोज दारु पिऊन घरात त्रास देत असल्याने पिता राजेंद्र यांच्याशी त्याचे वारंवार भांडण होत होते. दररोजच्या या त्रासाला राजेंद्र वैतागले होते. रोहित हा दारु पिऊन घरात आल्यानंतर त्याचे पुन्हा वडिलांशी भांडण काढले. यावेळी रागाच्या भरात राजेंद्र यांनी मुलगा रोहित फावड्याने डोक्यात मारुन याचा खून केला. कटरने त्याचे हात पाय व मुंडके तोडून पोत्यात भरुन जवळच असलेल्या गणेश तलावात टाकले. घटनेबाबत राजेंद्र हंडीफोड यांनी पोलिसात हजर होऊन मुलाच्या खूनाची कबुली दिली. पोलीसांनी सुभाषनगर येथे हंडीफोड याच्या प्लाॅटवर गेल्यानंतर तेथे रोहित याचा मुंडके व हातपाय नसलेला मृतदेह सापडला. पोटच्या मुलाचा बापाकडून क्रूरपणे खूनाच्या घटनेने पोलिसही चक्रावले होते. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.