प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज: जयप्रकाश काबरा
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा व कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटन यांच्यावतीने जुनून जीतका या मोटिवेशनल कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी :कयुम शेख
दि .२ प्रत्येकाने नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. अशा सकारात्मक दृष्टिकोनातूनच आपले जीवन समृद्ध होऊ शकते असे उद्गार प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर जयप्रकाश काबरा (मुंबई) यांनी काढले. कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा व कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटन यांच्यावतीने जुनून जीतका या मोटिवेशनल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून श्री काबरा बोलत होते.
येथील महेश क्लब मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात 225 अधिक सदस्य उपस्थित होते. जयप्रकाश काबरा हे एक प्रभावशाली व्यक्तिमत्व असून त्यांनी आज पर्यंत अनेक व्याख्याने दिली आहेत. प्रत्येकांच्या नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे दोन्ही संघटनांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी केले. ते म्हणाले काबरा यांच्या वाणीतून अनेकांना मोठी प्रेरणा मिळते व यशस्वी उद्योगासाठी मूलमंत्र त्यांच्याकडून मिळते यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी कार्यकारणी सुचीचे प्रकाशन जयप्रकाश काबरा यांच्या हस्ते व कमिटी सदस्य अशोक मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना श्री काबरा म्हणाले,जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. पण या चढउतारा वेळी प्रत्येकाने मनामध्ये धैर्य निर्माण करण्याची आवश्यकता आहे. जर आपण धैर्य निर्माण केले तर कोणत्याही गोष्टीवर सहजपणे आपण मात करू शकतो. जीवन समृद्ध आहे परंतु त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा. या सकारात्मक भूमिकेतूनच आपल्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते व हीच ऊर्जा आपल्याला यशस्वी बनवत असते. सुमारे दीड तास झालेल्या भाषणामध्ये त्यांनी अनेक उदाहरणे देऊन यशस्वी जीवनाचे मंत्र स्पष्ट केले.
कोल्हापुर ज़िला माहेश्वरी सभा अध्यक्ष नितीन धूत, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संगठन अध्यक्ष विनित तोष्णीवाल, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभाचे सूचना-प्रसारण मंत्री मुकेश खाबाणी, महाराष्ट्र प्रदेश महिला सभेचे पश्चिमांचल उपाध्यक्षा सौ कांता लाहोटी, इचलकरंजी तहसील सभा अध्यक्ष रामगोपालजी मालाणी, इचलकरंजी तहसील महिला सभा अध्यक्षा सौ मंजुजी सोमानी, कोल्हापुर जिला माहेश्वरी युवा संगठन अध्यक्ष आनंद बांगड़, महेश नवयुवक मंडल चे अध्यक्ष चंद्रशेखर बांगड़ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रोजेक्ट प्रमुख रसिक आगीवाल, ललितनारायण लोया व प्रोजेक्ट कमेटी सदस्यसहित जिल्हा सभा व जिल्हा युवा संगठनचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार कोल्हापुर जिला माहेश्वरी युवा संगठन सचिव कृष्णकांत भूतड़ा यानी मानले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.