मिरज:प्रतिनिधी
दि:०४:Jan: कुपवाडमधील खासगी शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून अकरावीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडल्यानंतर त्याच शाळेत अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. दोघांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
याबाबत माहिती अशी – साक्षी रवींद्र जाधव (वय १७, रा. मिरज) या मुलीने शाळेच्या चौथ्या माळयावरून उडी मारण्याचा प्रकार मंगळवारी शाळा सुटल्यानंतर घडला. या वेळी तिचे पालकही शाळेत आले होते. उडी मारल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पालकांच्या मदतीने तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. याबाबत कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
या घटनेबाबत ठाणा प्रभारी सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले, की मुलगी शाळा सुटल्यानंतर दप्तर घेऊन बसमध्ये गेली होती. त्याच दरम्यान, तिचे पालक तिच्यासंबंधी शिक्षकांना विचारणा करण्यासाठी शाळेच्या आवारात आले होते. या दरम्यान, तिने बसमधून परत शाळेच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. दरम्यान, या घटनेला २४ तास उलटण्यापूर्वीच प्रथमेश हणमंत पाटील (रा. सुभाषनगर, मिरज) या मुलाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा मुलगाही याच शाळेत अकरावी विज्ञान विभागात शिक्षण घेत होता.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.