संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे विभागीय “क्रीडा स्पर्धेत” घवघवीत यश

जयसिंगपूर :राम आवळे

दि .१६ :आंतर अभियांत्रिकी डिप्लोमा विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित विभागीय ‘झोनल’ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये मुलींच्या स्पर्धांमधील “चेस” या सांघिक क्रीडाप्रकारात विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्याचबरोबर “हॉलीबॉल” आणि “बास्केटबॉल” या सांघिक क्रीडाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुलांच्या स्पर्धेमध्ये “बास्केटबॉल” सांघिक क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आणि “हॉलीबॉल” या सांघिक क्रीडाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.
वैयक्तिक झोनल स्पर्धे मध्ये “गोळा फेक” शान जमादार यानी प्रथम क्रमांक पटकवला असून ५७ किलो वजन गट “कुस्ती” मध्ये सागर रानगे यानी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. झोनल वैयक्तिक मुली “१०० मीटर” धावणे या स्पर्धेमध्ये काव्या रेळे या विद्यार्थिनींने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या विभागीय स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या विभागीय स्पर्धेच्या यशामध्ये इन्स्टिट्यूटचे क्रीडा समन्वयक प्रा. सुरज जमादार आणि प्राध्यापिका सौ शुभांगी पाटील यांनी परिश्रम घेतले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.