गडहिंलजमध्ये सोमवारी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन अभियांत्रिकी , कृषी , फार्मसी : शिष्यवृत्तीसह, कागद पत्राची माहिती

यड्राव,:कयुम शैख 

दि ७ जुन: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळवा सोमवार (ता .१०) रोजी सकाळी १०.३० वाजता गणेश सांस्कृतिक भवन येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यात उपविभागीय पोलिस अधीक्षक रामदास इंगवले (गडग्हिंलज) व शरद इंजिनिअरिंगचे प्रा. डॉ. एस.डी . पाटील हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
बारावी परिक्षेनंतर महाविद्यालयीन शिक्षण व करिअरची नेमकी दिशा ठरविण्यासाठीचे मार्गदर्शन मेळावत मिळणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासनाकडून मिळणा-या शिष्यवृत्ती संस्थास्तरावरल शिष्यवृत्ती ईडब्ल्यूए यूस व टी एफडब्ल्यूए यूस याचा उपयोग, प्रवेशासाठी लागणा -या कागदपत्रे, सीट डिस्ट्रीव्यशन आणि श्रेणी (कॅटेगीरी ) आरक्षण या विषयाची माहीती मिळणार आहे. बारावी नंतरचे महाविद्यालयीन प्रवेश, उपलब्ध पर्यायांची माहिती , अभियांत्रिकी ,कृषी पदवी , फार्मसी, स्पर्धा परिक्षा या सह विविध क्षेत्रातील मार्गदर्शन या मेळाव्यात मिळणार आहे. त्याचबरोबर विविध महाविद्यालय स्टॉलसह सहभागी होणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.