कोल्हापूर:योगेश कांबळे
चर्चेचा विषय ठरलेल्या भवानीपुर मतदारसंघात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अखेर ५८हजार पेक्षा जादा मतांनी विजयी झाले आहेत. बॅनर्जी याच्यासाठी हा विजय महत्त्वपूर्ण असून आपले मुख्यमंत्री पद अबाधित ठेवण्यासाठी त्यांना विधानसभेत आमदार होणे गरजेचे होते त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
भवानीपुर विधानसभा पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राम मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रियांका टिंबरेवाल यांचा पराभव केला आहे. बॅनर्जी याच्यासाठी मागील विजय पेक्षा हा विषय मोठा आहे.
झालेल्या निकालात मतमोजणीच्या २१ फेऱ्या मध्ये बॅनर्जी या टिंबरेवाल यांच्यापेक्षा पुढे होत्या या विजयाने त्यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित राहिले असून भवानीपुर हा त्यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. बॅनर्जी यांच्या कोलकातामधील निवासस्थान बाहेर तूर्णमुल काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅनर्जी विजयी होताच आनंदमय जल्लोष साजरा केला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.