**साहिल आंबवकरच्या गणेशोत्सवातील देखाव्याला पोलिस निरीक्षक अमित यादव यांची सदिच्छा भेट**
*संगमेश्वर:*
नावडी येथील गणेश भक्त कु. साहिल सुनील आंबवकर यांनी घरगुती गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारलेली बार्बाडॉस स्टेडियम (वेस्ट इंडीज) ची प्रतिकृती पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. या देखाव्याचे आकर्षण इतके वाढले आहे की विविध गावांमधून लोक आवर्जून येऊन साहिलच्या कलाकृतीचे कौतुक करत आहेत.
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. अमित यादव यांनी साहिलच्या घरी सदिच्छा भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. बार्बाडॉस स्टेडियमची प्रतिकृती पाहून यादव साहेब थक्क झाले आणि त्यांनी साहिलच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले.
या प्रसंगी मा. पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्यासमवेत पोलिस उपनिरीक्षक मा. प्रशांत शिंदे, हेडकॉन्स्टेबल किशोर जोयशी, पोलिस हवालदार सचिन कामेरकर आणि होमगार्ड कांबळे यांसह इतर पोलिस अधिकारी देखील उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.