▪️संगमेश्वर :- मुजीब खान
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या धामणी उपकेंद्रात आज विक्रमी ४०४ जणांचे लसीकरण करण्यात आले.
कोविशिल्ड, कोवॅक्सिन याचे पहिले – दुसरे डोस संबंधितांना देण्यात आले. यासाठी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक – सेविका, अंगणवाडी सेविका, आशा, रुग्णवाहिका चालक आदींसह अनेकांनी प्रयत्न केले.एका आरोग्य उपकेंद्रात एव्हडे लसीकरण होण्याचा संगमेश्वर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. याबद्दल बुरंबी आरोग्य केंद्रातील सर्वांचे कौतुक होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.