नवजीवन विद्यालय फुणगूसच्या विद्यार्थ्यांची पावसाळी मैदानी स्पर्धेत यशस्वी कामगिरी

 

कडवई: मुजीब खान 

 

साडवली येथील कै. मीनाताई ठाकरे विद्यालयात नुकत्याच झालेल्या १७ वर्षे वयोगट मुलं-मुलींच्या पावसाळी मैदानी स्पर्धांमध्ये नवजीवन विद्यालय फुणगूसच्या विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळ प्रकारांमध्ये लक्षनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धांमध्ये नवजीवन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. खालील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे:

 

कु. दिपाली प्रमोद शिंदे – ३००० मीटर धावणे (पहिला क्रमांक)

 

कु. गार्गी विश्वास बाचीम – १५०० मीटर धावणे (दुसरा क्रमांक)

 

कु. सिमरन समीर घेवडे – १५०० मीटर धावणे (तिसरा क्रमांक)

 

कु. अनुष्का मंगेश भूवड – ४०० मीटर धावणे (पहिला क्रमांक)

 

कु. दिपाली प्रमोद शिंदे – ४०० मीटर धावणे (दुसरा क्रमांक)

 

कु. आकाश शैलेश शिगवण – ४०० मीटर धावणे (चौथा क्रमांक)

 

कु. पायल सूर्यकांत कांबळे – ३ कि.मी. चालणे (दुसरा क्रमांक)

 

कु. श्रावणी अरविंद नितोरे – ८०० मीटर चालणे (पहिला क्रमांक)

 

कु. अश्विनी संदीप मांडवकर – ८०० मीटर चालणे (दुसरा क्रमांक)

 

कु. श्रुती बारगूडे – २०० मीटर चालणे (चौथा क्रमांक)

 

कु. ओमकार श्रीपत घडशी – २०० मीटर चालणे (तिसरा क्रमांक), ११० मीटर अडथळा शर्यत (पहिला क्रमांक)

 

कु. तन्वी संजय खोले – १०० मीटर अडथळा शर्यत (चौथा क्रमांक)

 

 

या उत्कृष्ट कामगिरीमुळे १५ ऑक्टोबर रोजी डेरवण क्रीडा संकुल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नवजीवन विद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. दिपाली शिंदे, कु. गार्गी बाचीम, कु. श्रावणी नितोरे, कु. ओमकार घडशी, कु. अनुष्का भूवड यांचा समावेश आहे.

 

तसेच कु. तन्वी वेद्रे, कु. सावली शिंदे, कुमार ज्ञानदीप शितप, प्रणय मुंडेकर, ऋतिक काजरेकर, वेदांत थुळ, आकाश शिगवण, रुणाल माईंगडे व अथर्व मोहिते यांनी देखील विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून स्पर्धा पूर्ण केली आहे.

 

या यशामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शाळेच्या मुख्याध्यापक श्री. सुनिल पाटील, संस्था अध्यक्ष श्री. चंदुभाई देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. अरुण डिंगणकर, सचिव श्री. दिलीपभाई कुळकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख श्री. सुरेश रणदिवे, क्रीडा विभाग सहाय्यक श्री. निलेश घडशी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

फुणगूस खाडी भागातील जनतेनेदेखील विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. याशिवाय शाळेच्या क्रीडा विभागासाठी आर्थिक मदत देण्यासाठीही काही उदार व्यक्तींनी पुढाकार घेतला असून, राहुल कुलकर्णी आणि डॉ. अरुण अशोक डिंगणकर यांनी प्रत्येकी १०,००० रुपये देणगी स्वरूपात दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.