रिजन टीचर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
कडवई: मुजीब खान
नोकरीच्या सुरुवातीपासून शाळा व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केलेले विविध उपक्रम, तसेच सामाजिक व पर्यावरण जनजागृतीच्या कार्याची दखल घेत रिजन टीचर्स ऑर्गनायझेशनने सन २०२४/२५ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.
हा पुरस्कार सोहळा २९ सप्टेंबर २०२४ रोजी खेड (जि. रत्नागिरी) येथील काळकाई देवस्थानच्या भव्य सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील अनेक शिक्षक उपस्थित होते.
राज्यातील एकूण ६९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले, यामध्ये त्यांच्या कार्याची महत्त्वपूर्ण दखल घेण्यात आली.
या उपक्रमामुळे शिक्षकांच्या योगदानाचे महत्व आणि शाळा व समाजाच्या विकासात त्यांचा रोल स्पष्ट झाला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.