मानवी हक्क क्रियाकलाप आणि भ्रष्टाचारविरोधी गुन्हे कृती समितीच्या रत्नागिरी चिपळूण अध्यक्षपदी श्री. समीर दत्तात्रय जाधव यांची नियुक्ती
गुहागर: दिलीप जाधव
मानवी हक्क क्रियाकलाप आणि भ्रष्टाचारविरोधी गुन्हे कृती समितीच्या “रत्नागिरी चिपळूण अध्यक्ष” पदासाठी श्री. समीर दत्तात्रय जाधव पॉवर हाऊसजवळ, पाग, चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
अखिल भारतीय मानवी हक्क क्रियाकलाप आणि भ्रष्टाचारविरोधी गुन्हे कृती समितीचे अध्यक्ष श्री. बिलाल मुसा शेख यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. श्री. जाधव यांची नेमणूक त्यांच्या सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग व प्रामाणिक सेवेमुळे करण्यात आली आहे.
नवीन अध्यक्ष म्हणून, श्री. जाधव यांना मानवी हक्कांचे संरक्षण, भ्रष्टाचारविरोधी उपक्रम राबविणे आणि समाजातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे स्थानिक पातळीवर समितीच्या कार्यक्षमतेला आणखी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
श्री. समीर जाधव यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या जात असून, त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वपूर्ण कामगिरी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.