जिल्हा परिषद केंद्र शाळा नं. १: विद्यार्थ्यांना देणगी स्वरूपात खेळाचे ५० ड्रेस किट्स प्रदान

 

मळण: दिलीप जाधव

जिल्हा परिषद केंद्र शाळा नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उठावांतर्गत खेळासाठी ५० ड्रेस किट्स देणगी स्वरूपात प्राप्त झाले आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी श्री. वैभव गंगाराम बागवे यांनी आपल्या वडील कै. गंगाराम भिकाजी बागवे गुरुजी यांच्या स्मरणार्थ २५ ड्रेस किट्स देणगी दिल्या. तसेच, शाळेच्या १९९७-९८ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी देखील २५ ड्रेस किट्स शाळेला प्रदान करून योगदान दिले आहे.

[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..

नियाझ खान —9921435330..

दिपक तुळसणकर —9730389876)..

नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].

या खेळांच्या ड्रेस किट्समुळे प्रेरणा मिळालेल्या विद्यार्थ्यांनी यंदा जिल्हा परिषद आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धेत केंद्र, बीट, तालुका आणि जिल्हास्तरावर उत्तम कामगिरी करत प्रशंसनीय यश मिळवले.

शाळेच्या यशस्वी सहभागासाठी गावचे सरपंच नारायण गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, तसेच सेवाभावी कार्यकर्ते संतोष साळवी, पुनम साळवी, प्रमोद साळवी, ग्राम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष निलेश धामणस्कर, वाडीप्रमुख आणि गावातील इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले. त्यांनी क्रीडा स्पर्धेच्या वाहतूक व अन्य खर्चाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

शाळेच्या वतीने या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच, श्री सत्यनारायण सन्मित्र मंडळ, मळण यांनी शाळेला नोटिसबोर्ड देणगी दिल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या देणगी आणि सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली आहे. शाळेने असेच यश पुढील काळातही कायम राखावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.