कोल्हापूर जिल्हयातील आरोग्य सुविधा वाढवणेस प्राधान्य
प्रकाश आबिटकर,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर,: प्रतिनिधी
दि. २६ : जिल्हयातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा उपलब्ध होऊन उपचार व आरोग्य सुविधा देणे सोयीचे होण्यासाठी तसेच जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविणेस आवश्यक रुग्णसेवेसाठी नेहमीच प्राधान्य असल्याचे मत प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर विभागस्तरा वरील कार्यक्रमामध्ये रुग्णसेवाचा दर्जा उंचावण्यासाठी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रानां रुग्णवाहिका (अॅब्युलन्स) व ०३ व्हॅक्सिन व्हॅनचे लोकार्पण मा. नाम. प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली शेंडा पार्क येथे आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर आवारामध्ये अॅब्युलन्स लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यामध्ये हुपरी, पु.शिरोली, गवसे, मडूर, आंबा व माण प्राथमिक आरोग्य केंद्रानां रुग्णवाहिकाचे प्रधान करण्यात आले. जिल्हास्तरावर कोल्हापूर उपसंचालक कार्यालय ०१ व कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यालय ०१ व सिंधुदूर्ग जिल्हयाला ०१ अशा ०३ व्हॅक्सिन व्हॅन प्रधान करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस., उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, प्राचार्य कुष्ठरोग केंद्र प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. पालेकर व जिल्हयातील आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
श्री. आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्हयामध्ये महाराष्ट्रतील असणा-या सोयी सुविधा कोल्हापूर जिल्हयासाठी प्राधान्याने उपलब्ध करुन देणे, अधिकारी व कर्मचारी यांची पदे भरणे, आरोग्य सुविधा मध्ये विविध साधन सामग्री उपलब्ध करुन कोल्हापूर जनतेला आरोग्य सेवा उत्तमदर्जाच्या मिळवून देणे माझी जबाबदारी आहे परंतु आपल्या सर्वाची आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांची सुध्दा सुविधाचा जनतेला कसा लाभ प्राधान्याने देता येईल यांची जबाबदारी सुध्दा आपण घ्यावी असे निर्देश दिले. आरोग्य विभागातील रुग्ण सेवेचा दर्जा वाढविणेसाठी दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका सुविधा देणेसाठी राज्यस्तरीय अनुदानांतुन सदर रुग्णवाहिका देणेत आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हयातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा उपलब्ध होऊन उपचार व आरोग्य सुविधा देणे सोयीचे होणार आहे.
विविध आजारांचा उल्लेख करत लोकांमध्ये विविध आजारची जनजागृती करुन जनतेमधील चुकिच्या माहितीमुळे गैरसमज निर्माण होऊन समाजामध्ये भीती निर्माण होते त्याकरिता आपण अत्यंत चांगल्या प्रकारे प्रचार व प्रसार करणेची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्याकरिता विविध माध्यमाचा उपयोग करुन योग्य माहिती प्रसिध्दी करणेत यावी.उपलब्ध करुन दिलेल्या वाहनांचा योग्य प्रकारे वापर व देखभाल करुन जनतेच्या आरोग्य सुविधा देणे व जास्तीत जास्त दुर्गम भागातील माता व बालकांना आरोग्य सुविधा त्वरीत उपलब्ध कराव्यात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केली कोल्हापूर जिल्हयातील आरोग्य विषयक कामकाजा बाबत माहिती दिली व आरोग्य विभागा गरोदर मातानां व बालकांना आरोग्य सुविधा देणेस अग्रेसर असल्याचे सांगितले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.