कडवई वरची कुंभारवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन
कडवई,दिपक तुळसणकर
दि. १२ मार्च २०२५ –
सालाबादप्रमाणे यावर्षीही कडवई वरची कुंभारवाडी (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहून सर्व भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हावे आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ११:०० वाजता – श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६:३० ते ८:०० वाजता – हरिपाठ, रात्री १०:०० वाजता – तुफान विनोदी लोकनाट्य (कोकणचा साज संगमेश्वरी बाज)
या पवित्र सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.