जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तिहेरी यश
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .१२ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय, शासकीय खो खो स्पर्धा मंगळवार दि. ९ सप्टेंबर, २०२५ या दिवशी इलेव्हन क्रीडा मंडळ येथे पार पडल्या. या स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या १४,१७ व १९ वर्षाखालील संघांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून तिहेरी यश संपादन केले. या तिन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी कामगिरीसाठी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा. श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, ट्रेझरर श्री महेशजी बांदवलकरसो, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे साहेब, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारोतराव निमनकर साहेब तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका, ए. एस काजी मॅडम पर्यवेक्षक श्री एस एस कोळी , सौ व्ही एस लोटके , ज्येष्ठ शिक्षक श्री डी डी कोळी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.
खो खो खेळाचे प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक कृष्णात पाटील यांनी खेळाडूंना प्रशिक्षित केले तर जिमखाना प्रमुख श्री बी एस माने यांचे संघास मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.