कागलमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धा
व्ही.ए.घाटगे बोटींग क्लब येथे रविवारी आयोजन
कोल्हापूर: सौ रेणुताई पोवार
दि:२३ देशभरातील लोकांना मॅराथॉन व ट्रायथलॉन स्पर्धेसाठी प्रशिक्षण देणाऱ्या अर्हता क्लव, या संस्थेमार्फत रविवारी कागल शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ट्रायथलॉन आणि डू ॲथलॉन या भारतीय व ऑलंपीक मान्यताप्राप्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कागल येथील व्ही.ए.घाटगे तलावाच्या ठिकाणी रविवारी सकाळी ६.०० वाजता या स्पर्धेला सुरूवात होईल. स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.अशी माहिती नगराध्यक्षा सौ. माणिक माळी यांनी दिली .
कोविड-१९ च्या राज्य शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन करून स्पर्धा पार पाडण्यात येणार आहेत. कोविड-१९ चाचणी अहवाल निगेटीव्ह असणाऱ्या
स्पर्धकांनाच या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पर्धा आयोजक अर्हता क्लबने दिली आहे.
ट्रायथलॉन स्पर्धेसाठी १.५ कि.मी स्विमींग, ४० कि.मी.सायकलींग आणि १० कि.मी. रनिंग, तर डू ॲथलॉन स्पर्धेसाठी ५ कि.मी. रनिंग, ४० कि.मी. सायकलींग आणि
१० कि.मी.रनिंगचा समावेश आहे . स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय ट्राय ॲथलॉन व डू ॲथलॉन स्पर्धेप्रमाणे अतिशय अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचे निकाल काटेकोरपणे संगणकाच्या सहाय्याने उपलब्ध होणार आहेत.
शनिवार दि . २३ तारखेला स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना नियमावली समजून सांगण्यात येणार आहे. तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते स्पर्धकांना किट बंग वाटपही करण्यात येणार आहे.कागलच्या व्ही.ए.घाटगे तलावावर सुशोभिकरणा नंतर कागल वासियांच्या मनोरंजना साठी या तलावावर विविध प्रकारच्या स्कूटर बोट, मोटर बोट, कौटुंबीक पार्टी बोट, कयाकिंग, पॅडल बोट व लहान मुलांसोबत तरूणाईसाठी मनोरंजक खेळणी कोलंबस राईडस, जंपींग बसून, कॅटरपिलर, राईड अशा अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी कागल वासियांना आंतरराष्ट्रीय स्पर्धा अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कागलमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ट्राय ॲथलॉन, डू ॲथलॉन स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रोत्साहन व कागल नगरपरिषद, कागल आणि आजरेकर फौंडेशन, कोल्हापूरयांचे सहकार्य लाभले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.