रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ११२ पिशव्या रक्त संकलित
दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन
सांगली: आय्यान पटेल
दि. ०४ : जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये. मागेल तेव्हा रक्त उपलब्ध राहील, यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुसऱ्या टप्प्यात झालेल्या शिबिरात ११२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक २७ नोव्हेंबर रोजी १०१ पिशव्या रक्तदान झाले होते. तसेच आज झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये ११२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी कार्यालयामधील या दोन्ही शिबिरातून एकूण २१३ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजला येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटी डॉ. शिरगावकर रक्त संकलन केंद्र यांच्यावतीने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे, तहसीलदार लीना खरात, तहसीलदार (महसूल) जितेंद्र मोरे, मिरजच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे – धुमाळ, अप्पर तहसिलदार सांगली अश्विनी वरुटे, अनिल कोळी, तसेच, इंडियन रेडक्रॉस सोसायटी डॉ. शिरगावकर रक्त संकलन केंद्राचे अध्यक्ष डॉ. शिरीष काळे, उपाध्यक्ष डॉ. श्रीनिवास नाटेकर, विनय भट तसेच पदाधिकारी व स्टाफ, जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान चळवळीच्या या सांगली पॅटर्नमध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. तसेच, रक्तदान केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.