आरवलीत गंजलेल्या विद्युत पोलकडे महावितरणचे दुर्लक्ष

२६ जानेवारीला आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी :सचिन पाटोळे 

दि .४ : संगमेश्वर तालुक्यातील आरवली (भोसले वाडी) येथे ग्रामस्थांच्या घराजवळील विद्युत पोल पूर्णतः गंजल्याने धोका निर्माण झाला असूनही महावितरणकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भागात ६० ते ७० घरे असून सुमारे ३०० ते ४०० लोकसंख्या वसलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून गंजलेला हा पोल कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

          या गंभीर स्थितीबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गवंडी यांना तोंडी व लेखी सूचना देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. वीजबिलाची १०० टक्के वसुली असलेल्या भोसले वाडीत सेवा देताना मात्र महावितरणकडून कुचराई होत असल्याचा आरोप गावकर राजेंद्र भोसले यांनी केला आहे. वीजबिल वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी नियमितपणे तगादा लावतात; परंतु सुरक्षा विषयाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले. गंजलेला पोल तत्काळ बदलून नवीन पोल बसवावा, अन्यथा येत्या २६ जानेवारी रोजी महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकर राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.